पुण्यात काल 23 जुलै हा पुलॉकडाऊनचा शेवटचा दिवस होता. पण आज पासून (२४ जुलै रोजी पासून लॉकडाऊन असणार आहे की नाही किंवा काही अटी-नियम लागू होणार आहेत याबबात जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. पुण्यातील कोरोनाची स्थिती पाहता काही निर्बंध लागू असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवार या दोन दिवशी इथून पुढे लॉकडाऊन घालण्याचा विचार असल्याच त्यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या दहा दिवसांच्या कालावधीत १ लाखांहून अधिक टेस्ट केल्या आहेत. टेस्ट वाढवल्याने रुग्णांची संख्या वाढल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी लग्न समारंभात किती लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी द्यायची याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. लग्न समारंभांसाठी आधी ५० व्यक्तींना परवानगी दिली होती, पण आता लग्नासाठी आणखी कमी लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी देण्याचा विचार आहे असं ते म्हणाले आहेत. गर्दी टाळण्यासाठी काही निर्बंध घालण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.