किशोर आवारे हत्या प्रकरण : किशोर आवारे हत्या प्रकरणात आरोपींकडून धक्कादायक खुलासे

रविवार, 14 मे 2023 (17:19 IST)
वडिलांच्या कानशिलात लगावल्याने आरोपीने किशोर आवारेंच्या हत्येची सुपारी दिली असा धक्कादायक खुलासा आरोपीने केला आहे. तळेगाव दाभाडे इथे किशोर आवारे यांना गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीना अटक केली असून त्यांच्याकडून धक्कादायक खुलासा झाला आहे.   
 
ळेगाव दाभाडे येथील मोठे प्रस्थ असलेल्या व्यक्तीच्या कानशिलात दिली. त्या रागातून त्या व्यक्तीच्या मुलाने किशोर आवारे यांच्या हत्येची सुपारी दिली.पोलिसांनी सुपारी दिलेल्या गौरव चंद्रभान खळदे याला अटक केली आहे. गौरव खळदे हे माजी नगरसेवक चंद्रभान खळदे यांचे सुपुत्र आहे. चंद्रभान खळदे यांचा वाद किशोर आवारे यांच्या सोबत झाला त्यात आवारेंनी खळदे यांच्या कानशिलात  लगावली. त्याचा राग गौरव खळदे यांच्या मनात धुमसत होता. त्याने किशोर आवारे यांच्या हत्येची सुपारी आरोपींना दिली. 

पोलिसांनी या हत्ये प्रकरणी काही आरोपींना अटक केली आहे.  आरोपींना शनिवारी वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती