भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना

गुरूवार, 17 जून 2021 (08:37 IST)
फिटनेस ट्रेनिंगचे क्लासेस येण्यासाठी निघालेल्या 31 वर्षीय तरुणाचा पुण्यातील गंगाधाम चौकात भर रस्त्यात अडवुन एका तरुणाने विनयभंग केला. एकतर्फी प्रेमातून हा सर्व प्रकार घडला. खडक पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे.अर्जुन बरमेडा (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका 31 वर्षीय तरुणीने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी फिटनेस ट्रेनर आहे. चार-पाच वर्षापूर्वी तिची ओळख आरोपीशी झाली होती. आरोपीने एकतर्फी प्रेमातून तिला लग्नाची मागणी घातली. तिने नकार देताच तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या मित्र-मैत्रिणींना देखील तिच्याशी संपर्क ठेवण्यास सांगितले. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने आरोपीला समजावूनही सांगितले परंतु त्याच्या वर्तणुकीत फरक पडला नाही.
 
दरम्यान  सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरुणीही गंगाधाम चौकातून फिटनेस ट्रेनिंगचे क्लासेस घेण्यासाठी जात असताना आरोपीने तिचा रस्ता आडवला. भररस्त्यात दारूच्या नशेत या लग्नाची मागणी घातली आणि तिच्यासोबत गैरवर्तन केले. त्यानंतर तिचा मोबाईल घेऊन आरोपी निघून गेला. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटकही केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती