पुण्यात रागात येऊन अल्पवयीन मुलाकडून महिलेला कारने चिरडण्याचा प्रयत्न,आरोपीला अटक

मंगळवार, 18 जून 2024 (09:34 IST)
पुण्यातील आळंदी जवळ वडगाव घेणंद गावात किरकोळ वादावरून एका अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला कारने चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. 
 
सदर प्रकरण शनिवारचे आहे. महिलेचा आणि अल्पवयीन मुलाच्या कुटुंबात बऱ्याच वर्षां पासून वाद सुरु आहे. शनिवारी किरकोळ कारणावरून दोंघात वाद झाला. 

वाद सुरु असताना आरोपीने कार काढली आणि महिलेच्या अंगावर घालून तिला धडक दिली. वाहनाची धडक लागून महिला दूर जाऊन पडली आणि थोडक्यात बचावली.  

झाले असे की दोघांच्या भांडणामुळे या मुलाला राग आला आणि त्याने रागाच्या भरात येत महिलेच्या अंगावर कार घातली. या घटनेचा व्हिडीओ महिलेने बनवला असून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.अल्पवयीन व्यक्तीवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याला  बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे. बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती