कोरोना औषधांची अवैध मार्गाने विक्री ; तिघांना अटक

शनिवार, 8 मे 2021 (16:30 IST)
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधांची अवैध मार्गाने विक्री करणा-या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरीतील डिलक्स चौक ते काळेवाडीकडे जाणा-या रोडवर हा प्रकार उघडकीस आला.
 
नितीन हरिदास गुंड (वय 23, रा. विजयनगर, काळेवाडी), सागर काकासाहेब वाघमारे (वय 24, रा.विजयनगर, काळेवाडी) व अजय बाबाराज दराडे (वय 19, रा. मैत्री चौक, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
 
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरिक्षक भाग्यश्री अभिराम यादव (वय 44, रा.धनकवडी, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपींनी कोरोनावर उपचारासाठी आवश्यक 80 हजार रुपये किंमतीची औषधे अवैध मार्गाने मिळवली. ही औषधे डॉक्टरांच्या प्रिसक्रिप्शन शिवाय विक्री करून लोकांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक केंगार करीत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती