पुण्यात अनलॉक ला हिरवा कंदील :पर्यटनस्थळे,महाविद्यालये सुरु होणार,हॉटेल 11 वाजे पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी

शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (19:59 IST)
पुण्यात अनलॉक ला हिरवा कंदील मिळाला आहे.आणि पुण्यातील पर्यटनस्थळे, महाविद्यालये उघडणार तसेच हॉटेल ला 11 वाजे पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.येत्या सोमवारपासून (11ऑक्टोबर) पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पालक मंत्री अजित पवार यांनी दिली.
सध्या पुण्यात त्यांनी कोरोनाच्या आढावा घेतल्यावर माध्यमांशी संवाद साधत बैठकीत घेतलेल्या विविध निर्णयाची माहिती दिली.त्यांनी माध्यमांना बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णय बद्दल सांगितले.त्यानुसार -

* सोमवार पासून म्हणजेच 11 ऑक्टोबर पासून पुण्यात महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली.
* त्यासाठी विद्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक असणार.बाहेरहून आलेल्या विध्यार्थ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असेल.
* खासगी आस्थापनेत कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली.
* ग्रामीण आणि शहरी भागातील पर्यटनस्थळे सुरु होणार.
* 22 ऑक्टोबर पासून नाट्यगृह आणि सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरु होणार.
* ट्रेनिंग सेंटर सुरु होणार.
* सर्व हॉटेलला 11 वाजे पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली.
या सर्व निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवार म्हणजेच 11 ऑक्टोबर पासून करण्यात येणार आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती