पुण्यातील मुलींच्या वसतिगृहात पिझ्झा ऑर्डर केल्याबद्दल चार विद्यार्थिनींचे निलंबन

सोमवार, 10 फेब्रुवारी 2025 (18:16 IST)
पुण्यातील एका वसतिगृहात चार विद्यार्थिनींना ऑनलाईन पिझ्झा मागवणे महागात पडले. या चौघींना समाज कल्याण वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. हे वसतिगृह समाज कल्याण वसतिगृह असून पुण्यातील मोशी येथे आहे. या वसतिगृहात सुमारे 250 मुली राहतात आणि शिक्षण घेतात.
ALSO READ: NIBE लिमिटेडने पुण्यात अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल आणि प्रिसिजन मशीनिंग उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले
हे वसतिगृह सामाजिक न्याय विभागाकडून चालवले जाते. वसतिगृहातील वार्डनला वसतिगृहातील एका विद्यार्थिनीच्या खोलीत ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केल्याची माहिती मिळाली. त्यांनी चौकशी केल्यावर संबंधित विद्यार्थ्यांनी नाकारले. असे असून देखील वसतिगृहाच्या वार्डन ने विद्यार्थिनीवर कडक कारवाई केली आणि चौघींना एका महिन्यांसाठी वसतिगृहातून काढून टाकण्यात आले.  

मुलींच्या पालकांना वसतिगृह प्रशासनाने बोलावून मुलींच्या चुका निदर्शनास आणून दिल्या.पालकांनी मुलींच्या वतीने अपील करून देखील अधिकाऱ्यांनी कोणताही दिलासा न देता विद्यार्थींना वसतिगृह सोडण्याचे आदेश दिले. 
ALSO READ: महाराष्ट्र : बारावीच्या परीक्षा उद्यापासून सुरू होणार, कॉपी रोखण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार
वसतिगृह प्रशासनाने विद्यार्थिनींवर कारवाई करण्यापूर्वी अधिकृत सूचना जारी केली होती. या मध्ये स्पष्ट लिहिले होते की जर 8 फेब्रुवारी पर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याने पिझ्झा ऑर्डर केल्याचे कबूल केले नाही तर अशा विद्यार्थ्याला एका महिन्यांसाठी वसतिगृहातून बाहेर काढण्यात येईल.  
ALSO READ: महाराष्ट्र सरकारचा कर्करोगासंबंधित काळजी आणि उपचारांसाठी एक उपक्रम सुरू- एकनाथ शिंदे
समाज कल्याण वसतिगृह आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीतील मुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून राहण्याची व्यवस्था करते. अशा परिस्थितीत, अशा कठोर निर्णयांमुळे विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागू शकतो. त्यांच्या कारकिर्दीवर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती