पुणे पोर्शी कार प्रकरणाच्या पुराव्यांची छेडछाड करणाऱ्या फोरेंसिक विभागाच्या HOD आणि दोन डॉक्टरांना अटक

सोमवार, 27 मे 2024 (11:11 IST)
पुणे कार अपघात प्रकरणात रोज नवीन नवीन खुलासे होत आहे. आता  या केस मध्ये नवीन अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फॉरेंसिक विभागचे एचओडी म्हणजे हेडला अटक करण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांनी इतर दोन डॉक्टर्सला देखील ताब्यात घेतले आहे. या तिघांनावर पुराव्यांची छेडछाड केल्याचे आरोप आहेत. 
 
पुणे पोर्ष कार अपघात मधील अल्पवयीन आरोपीची मेडिकल टेस्ट पुण्यातील ससून रुग्णालयात केली गेली होती. या आरोपीने नशेमध्ये दोन जणांना चिरडले. ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. फॉरेंसिक तपासणीमध्ये डॉक्टर्सने दावा केला की, आरोपीने दारू घेतली नव्हती. आता फॉरेंसिक टीम वर आरोप आहे की, त्यांनी आरोपीचे ब्लड सँपल बदलून दिले. ज्यामुळे आरोपी नशेमध्ये होता हे पुरावे नष्ट झालेत. आता पोलिसांनी या प्रकरणावर मोठी कारवाई करत  फॉरेंसिक विभागचे HOD आणि इतर दोन डॉक्टर्सला ताब्यात घेतले आहे. 
 
 रिपोर्ट्सनुसार अपघातानंतर 19 मे ला सकाळी 11 वाजता पुण्यामधील ससून रुग्णालयात नेण्यात आले होते.  जिथे त्याची  फॉरेंसिक तपासणी करण्यात आली. सुरवातीच्या तपासणी मध्ये आरोपीच्या ब्लड सॅंपलमध्ये दारू पिण्याची गोष्ट समोर अली नाही. पण नंतर आरोपीच्या दुसऱ्या ब्लड रिपोर्ट मध्ये आली आणि त्यामध्ये आरोपीने दारू घेतली होती हे कबुल करण्यात आले. या सर्व प्रकारामुळे  पोलिसांना संशय आहे की, रुग्णालयाच्या फॉरेंसिक विभागने पुराव्यांसोबत छेडछाड केली आणि प्रकरणाच्या गंभीरतेला समजून  दुसरे ब्लड रिपोर्ट दिले आहे. 

Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती