पुण्यात प्रतिबंधित क्षेत्रात ही सुविधा दिली जाणार नाही. तसेच घरपोच मद्य पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, ओळखपत्र, वाहतूक करणे यासाठी परवानगी देण्यासाठी एक दिवसाचा कालावधी लागणार असल्याने 14 मेपासून सकाळी दहा वाजल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकेल, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणार्या मद्य विक्री दुकानांची यादी दिसेल. सदर पैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल. आवश्यक माहिती नमूद केल्यानंतर ग्राहकास इ– टोकन मिळेल. सदर टोकन आधारे ग्राहक आपल्या सोयीच्या वेळी सबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून मद्य खरेदी करु शकतात.