येथे मास्क नाही तर दारू नाही

सोमवार, 4 मे 2020 (22:39 IST)
लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला असून यात कंटेन्मेंट झोन वगळता सरकारने मद्य विक्रीची परवानगी दिली आहे. यामुळे सर्व राज्यांमध्ये दारुच्या दुकानांसमोर लांबलचक रांगा बघायला मिळाल्या. दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील काही भागांमधीला दारू दुकानांबाहेर मोठी गदी उसळली. तसेच पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये दारूची होम डिलिवरीही सुरू करण्यात आली आहे.
 
महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी नियम मोडत लोकं सर्रास रांगा लावून उभे दिसले. इकडे गोव्यात दारूची १३०० दुकानं आहे. परंतू गोव्यात सोशल डिस्टन्सिंगसह आणि मास्क घातलेलं नसेल तर दारूही देणार नाही, असा निर्णय गोवा लिकर ट्रेडर्स असोसिएशनने घेतला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती