राज्यात दारुचा मर्यादित साठा, गोव्यात स्टॉक संपण्याची भीती

शनिवार, 2 मे 2020 (12:33 IST)
केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाउन वाढवलेलं असले तरी सरकारने काही अटींसह काही दुकानं उघडण्याची परवानगी दिली आहे त्यात केंद्र सरकारने काही भागांत काही अटींसह दारुची दुकानं उघडी ठेवण्यास देखील परवानगी दिली आहे. याने अनेक लोकांना राहत मिळेल असं चित्र असताना गोवा राज्यातील बिअर शॉप धारकांना एक वेगळीच काळजी लागली आहे. येथील दुकान मालकांना स्टॉक संपण्याची भीती वाटत आहे. 
 
गोवा ग्रीन झोन मध्ये असून केंद्र सरकारने बिअर दुकानं उघडण्यास परवानगी दिली असली तरीही परदेशातून येणाऱ्या मालावर अद्याप बंदी असल्यामुळे गोव्यातील दुकानांमधला स्टॉक संपण्याची चिंता सतावत आहे. 
 
गोव्यात स्कॉच, व्हिस्की आणि इतर दारुचे प्रकार इंग्लंड, फ्रान्स, स्पेन आणि इटली या देशांमधून आयात केले जातात. मात्र सध्या माल येत नाहीये आणि येत्या एक-दोन महिन्यांमध्ये हा सर्व साठा संपून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
गोवा लिकर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की ४ मे पासून गोव्यात बिअर शॉप उघडायला परवानगी देण्यात आली आहे. सुमारे १३०० दुकानांमध्ये दारुचा योग्य साठा आहे. मात्र हा साठा अधिक काळ पुरण्यासारखा नाही. 
 
तसेच येथे तयार होणार्‍या दारुसाठी देखील लागणारा कच्चा माल हा इतर राज्यातून मागवला जातो. परंतू सध्याच्या नियामांप्रमाणे राज्यांच्या सीमाही बंद केल्या असल्यामुळे दुकानं सुरु झाल्यानंतर कच्च्या मालाअभावी गोव्यात दारु तयार करण्यावरही बंधनं येऊ शकतात. अशात स्टॉक संपण्याची भीती आहेच वरून पर्यटकांनाच्या अभावामुळे दारुच्या व्यवसायावर ७० टक्के परिणाम होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती