पुण्याच्या ससून रुग्णालयातून एमडी ड्रग्जचे रॅकेट चालविणाराबहुचर्चित ड्रग्जमाफिया संशयित ललित पाटीलसह तीन संशयितांचा दहा दिवसांचा नाशिकचा पोलीस कोठडीतील मुक्काम संपला. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे आता पुन्हा मुंबईच्या ऑर्थररोड कारागृहात त्यांची रवानगी केली जाणार आहे.
एमडी ड्रग्ज व ससून प्रकरणातील संशयित ललित पाटीलसह त्याचे साथीदार संशयित रोहित चौधरी, जिशान शेख, हरिशपंत या तिघांचा ताबा नाशिकच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या शुक्रवारी घेतलाहोता. त्यांना चोख बंदोबस्तात शनिवारी पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयापुढे हजर केले होते. न्यायालयाने या चौघांना थेट १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना दुपारी पुन्हा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायाधीश यु.जी.मोरे यांच्या न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत चौघांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली.