सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त आहे. पुणे आणि पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असून देखील अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस नेते म्हणून अजित पवार सक्रिय नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. निवडणूक काहीच दिवसांवर आली असून निवडणुकीची प्रभाग रचना अजून जाहीर केली नाही. पुणे पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेची सर्व जबाबदारी अजित पवार यांच्यावर असून देखील ते सक्रियरित्या भाग घेत नसल्याने कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या येत आहे. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यातील पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावर बोलताना ते म्हणाले की काही गोष्टी दाखवायचा नसतात. तर कार्यकर्त्यांना खुश कसे करायचे हे माहित आहे. काही गोष्टी उघडउघड सांगायचा नसतात. मग त्या निवडणुकीच्या संदर्भात असो किंवा इतर असो. आमची कामे योग्य रीतीं सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 1992 साली पासून मी राजकारणात आहे. तेव्हापासून आतापर्यंत अनेक निवडणूक लढवल्या आहेत. कार्यकर्त्यांना कसे खुश करायचे आणि नाराज असल्यास त्यांची नाराजगी कशी दूर करायची हे मला चांगलंच माहित आहे. त्याप्रमाणे आम्ही कार्यकर्त्यांना समजावून त्यांची नाराजगी दूर करू. सध्या राज्याच्या अर्थसंकल्प सादर करण्याच्या कामाला प्राधान्य देत मी अर्थसंकल्पाचा कामात व्यस्त आहे. पक्षाचे पदाधिकारी पक्षाचे काम चोखरीतीने बजावत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.