शहरात तब्बल 211 धोकादायक वाडे, पालिकेने 33 धोकादायक वाडे पाडले

मंगळवार, 8 जून 2021 (07:59 IST)
पुणे शहरात जवळपास 211 धोकादायक वाडे आहेत. त्यापैकी 150 ठिकाणी दुरुस्ती झाली आहे, तर किरकोळ धोकादायक असलेल्या 115 वाड्यांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत तर पालिकेने गेल्या महिन्याभरात शहरातील 33 धोकादायक वाडे आणि इमारती जमीनदोस्त केल्या आहेत.
 
पावसाळ्यात धोकादायक इमारती, वाडे पडून होणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी पालिकेने धोकादायक इमारती उतरवण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरवर्षी पावसाळ्यात सीमाभिंती आणि जुन्या इमारती कोसळून होणारी जीवितहानी लक्षात घेऊन महापालिकेने सीमाभिंती आणि जुन्या इमारतींचे सर्वेक्षण सुरु केले आहे. त्यात 300 ठिकाणी सर्वेक्षण करून तीन ठिकाणचे लेबर कॅम्प हलविण्यात आले आहेत, तर 33 धोकादायक वाडे पाडले.
 
आत्तापर्यंत 300 ठिकाणी पाहणी करण्यात आली आहे. त्यात धोकादायक ठिकाणी असलेले 3 लेबर कॅम्प हलविण्यात आले आहेत, तर 4 सीमाभिंती धोकादायक झाल्या असून, त्या पाडण्यासाठी मालकांना नोटीस बजाविण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती