पिंपरीत 11वीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या

गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (12:36 IST)
पिंपरी चिंचवडमध्ये एका 17 वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतक मुलाचे नाव दशांत परदेशी असल्याचे सांगितले जात आहे.
 
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास घङलेल्या घटनेत नॅशनल हॅवी कंपनीसमोर 17 वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार तो मुलगा काल संध्याकाळी सहा वाजता घरातून बाहेर पडला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठले आणि शोध मोहिमेदरम्यान त्यांचा मृतदेह सापडला. त्याच्या डोक्यात गोळी लागली होती. बंद कंपनीसमोर तो मृतावस्थेत आढळून आला. अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा कोणाशीही वाद नसल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले आहे. मग ही हत्या कोणी आणि का केली? हा प्रश्न पोलिसांसमोर आहे.
 
तसेच पाच दिवसांपूर्वीच 18 डिसेंबर रोजी सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरात कातेपूरम चौकात ही घटना घडली होती ज्यात तरुणाचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव योगेश जगताप असल्याची माहिती समोर आली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती