पुणे जिल्ह्यातील इंदापूर जवळ काल दुपारी कारचा टायर फुटून अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्य झाला तर एक जण गंभीर जखमी झाला
सदर अपघात इंदापूर तालुक्यातील डाळज जवळ झाला असून अपघातातील सर्व जण तेलंगणातील रहिवासी होते. वेगात निघालेली कार पुण्यातून सोलापूरच्या दिशेने जात असताना कारचा टायर फुटून हा अपघात झाला. अपघातानंतर कार दोन ते तीन वेळा पालटली आणि लोखंडी खांबाला जाऊन धडकली आणि नाल्यात पडली.
या अपघातात 5 जण जागीच मृत्युमुखी झाले आहे. इरफान पटेल,मेहबूब कुरेशी, फिरोज कुरेशी हे मृत्युमुखी झाले तर रफिक कुरेशी हा गंभीर जखमी झाला आहे. सय्यद इस्माईल सय्यद अमीर याला किरकोळ मार लागला आहे.
अपघाताची माहिती मिळता स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह कार मधून बाहेर काढले आणि जखमीला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.