पुण्यात नराधमाकडून 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (19:50 IST)
सध्या देशात आणि राज्यात मुली आणि महिला सुरक्षित नाही. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणात दररोज वाढ होत आहे. पुण्यात एका 4 वर्षाच्या मुलीवर एका 32 वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आरोपी पीडित मुलीच्या ओळखीतील होता. मुलगी त्याला मामा म्हणायची.

सदर घटना घोरपडी येथील दुर्गामाता मंदिराच्या शेजारी ताराबाग सोसायटीजवळ, रेल्वेलाइनच्या बाजूला रविवारी 13 सप्टेंबर रोजी घडली आहे. 
 
आरोपीला मुलीच्या आईने मानलेला भाऊ मानले होते. आरोपीचे त्यांच्याघरात येणे जाणे होते. पीडित मुलीचे पालक मजुरीचे काम करतात. ते  रविवारी घरी नसताना नराधमाने मुलीला उचलून नेट असताना मुलीच्या मोठ्या बहिणीने त्याचा विरोध केला नंतर आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले.. नंतर आरोपी फरार झाला असून त्याच्या विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून पोलीस त्याचा शोध घेत आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती