याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेच्या पोलिसांना रक्त चंदनाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला होता. दरम्यान पुणे सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर टोल नाका जवळ एक पिकअप गाडी संशयास्पद अवस्थेत येताना दिसली. पोलिसांनी या गाडीला बाजूला घेऊन झडती घेतली असता आत मध्ये रक्तचंदनाचा मोठा साठा सापडला. पोलिसांनी गाडीतील तिघांनाही ताब्यात घेऊन अटक केली.