फर्निचर विक्रीसाठी फेसबुकवर जाहिरात देऊन ज्येष्ठ व्यक्तीची 1 लाख 32 हजारांनी फसवणूक

गुरूवार, 17 जून 2021 (08:51 IST)
फर्निचर विक्री करण्यासाठी फेसबुक वर जाहिरात देऊन एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल एक लाख 32 हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. पुण्यातील सलीसबरी पार्क परिसरात हा प्रकार घडला असून स्वारगेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेंद्र कुमार नावाच्या फेसबुक वापरकर्त्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला. कौशिक रमणलाल मेहता (वय 65) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी देवेंद्रकुमार नावाच्या व्यक्तीने फेसबुक वरून फिर्यादी यांना फर्निचरची जाहिरात दाखवली होती. त्यानंतर 60 हजार रुपयांचे हे फर्निचर पंचावन्न हजार रुपयात देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर हे फर्निचर देण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी ना वेगवेगळ्या बँक खात्यावर एक लाख बत्तीस हजार रुपये भरण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती