लहानपणापासून बहीण जेव्हा भावाला काही काम सांगते तेव्हा तो म्हणतो स्वत:ची कामे स्वत: करावी. त्यावर बहिणीने हट्ट धरला तर लेक्चर ऐकायला मिळतं असे की तुला आत्मनिर्भर व्हायचं असेल तर तुला स्वत:ला हे करायलाच हवं. आणि खरोखर या गोष्टी तेव्हा आठवतात जेव्हा अभ्यासाच्या वा नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडण्याची वेळ येते. म्हणूनच घराबाहेर पडण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे.
उपकरणेबाबत माहिती: आतापर्यंत गॅसची टाकी बदलणे, बल्ब बदलणे, फ्रीज दुरुस्त करणे, अश्यांतल्या कामात कधी डोकं घातलं नसेल तर ते आता गरजेचं आहे. फारशी नाही तरी थोडी बहुत या सगळ्यांची माहिती असणे आवश्यक आहे.
स्वत: ची सुरक्षा: घराबाहेर एकटीने राहणे आणि एकटीने शहरात फिरणे असुरक्षित असू शकतं म्हणून कराटे शिकला असाल तर खूपच छान आहे. याव्यतिरिक्त आपल्या बॅगमध्ये पेपर स्प्रे, चाकू, तिखट पावडर सारख्या वस्तू नेहमी असू द्या.