बिजींग ऑलम्पिकचे नवे तारे सोमवारच्या रात्री भारतीय जमीनीवर अवतरले. पैलवान सुशील कुमार सोमवारी रात्री उशीरा मायदेशी परतला. त्याचे विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. मात्र त्याच्या स्वागताच्या दरम्यान उडालेल्या गोंधळामुळे विजेंद्र कुमार गुपचूप आपल्या परिवारातील लोकांसह निघून गेला.
इंदिरा गांधी आंतररराष्ट्रीय विमानतळाच्या व्हीआयपी लॉंजमध्ये भारतीय खेळांच्या इतिहासात यापूर्वी कधीही न पाहीले गेलेले दृश्य पहायला मिळाले. सुशील आणि विजेंद्रच्या स्वागतासाठी आसूसलेल्या बापरोला आणि भिवानी गावातील लोक आपल्या ऑलम्पिक वीरांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करून होते. त्यात त्यांच्यासाठी असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचीही पर्वा न करता लोकांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. सुशीलचे आपले गुरू महाबली सतपाल यांच्यासोबत जेव्हा आगमन झाले तेव्हा त्याच्या चाहत्यांनी पोलिसांचे सुरक्षा कवच तोडून त्याच्याकडे धाव घेतली.
यापूर्वीच विजेंद्रचे वडील महीपाल सिंह यांना दिल्ली पोलिसांनी स्वागतासाठी आत जाण्यास मनाई केली. त्यावरून विजेंद्रचे वडील, त्याचा भाऊ मनोज आणि काका रमेश सिंह यांचा पोलिसांशी वादविवाद झाला.