निळू फुले यांचे मराठी चित्रपटांसाठीचे योगदान अतुल्यच होते. ते चित्रपटात जरी खलनायकाची भूमिका साकारत वास्तविक जीवनात मात्र त्यांच्या सारखा दुसरा सच्चा आणि चरित्र नायक पुन्हा होणे नाही अशी खंत व्यक्त करत मराठी कलावंतांनी निळू फुले यांच्या निधनाने दु:ख व्यक्त केले आहे.
निळूभाऊंच्या रूपाने मराठी चित्रपटांना एक टॉनिक मिळालं होतं. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी रिती झाली असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले आहे. ते माणूस म्हणून अत्यंत चांगले होते.
आपण त्यांच्यासोबत जरी अनेक चित्रपटात काम केले नसले तरी एक व्यक्ती म्हणून आपण त्यांना चांगले ओळखत होतो. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रसृष्टी पोरकी झाल्याचे मत सुलोचना ताईंनी व्यक्त केले आहे.