आजपासून सुरू होईल रेडमी नोट 4, रेडमी 4 आणि रेडमी 4A ची प्री-बुकिंग

जर तुम्हाला शाओमीचे स्मार्टफोन रेडमी नोट 4, रेडमी 4 आणि रेडमी 4A पैकी एखादा कोणता फोन विकत घ्यायचा असेल तर आज तुमच्याजवळ एक शानदार संधी आहे. शाओमी आज 12 वाजेपासून आपल्या या डिवाइसची प्री-ऑर्डर बुकिंग सुरू करणार आहे. यातून तुम्ही कोणताही स्मार्टफोन एमआय डॉट कॉमहून ऑर्डर करू शकता. कंपनीचे म्हणणे आहे की ऑर्डरची डिलिवरी पुढील पाच दिवसांमध्ये होईल.  
 
सांगायचे म्हणजे रेडमी नोट 4 ला तुम्ही फ्लिपकार्टहून देखील खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर हा फोन फ्लॅश सेलमध्ये विकण्यात येईल. रेडमी नोट 4 ला तुम्ही 12 वाजेपासून बुक करू शकता. हे एक फ्लॅश सेल आहे तर लवकरच हे स्मार्टफोन आऊट ऑफ स्टॉक होतील. तसेच रेडमी 4 आणि रेडमी 4ए ची सेल 20 आणि 22 जूनला अमेझॉन इंडिया वर होईल.  
 
शाओमी ने या अगोदर मार्च मध्ये देखील प्री बुकिंग सिस्टम चालू केले होते. कंपनीचे म्हणणे आहे की ग्राहक वेबसाइटवरून फारच सोप्यारित्या फोन ऑर्डर करू शकतात. एमआयची वेबसाइटहून फोन ऑर्डर केल्याने तुम्हाला पैसे ऑनलाईनच पे करावे लागणार आहे. ज्यानंतर फोन पुढील 5 दिवसांमध्ये ग्राहकाजवळ पोहोचेल. एमआयची वेबसाइटवर तुम्हाला कॅश ऑन डिलिवरीचे कुठलेही विकल्प मिळत नाही. त्याच बरोबर एक यूजर फक्त दोन स्मार्टफोनच प्री ऑर्डर करू शकतात. 

वेबदुनिया वर वाचा