10,000 पेक्षा कमी किमतीत मिळतील हे स्मार्टफोन

शनिवार, 9 मार्च 2019 (11:22 IST)
आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करीत असल्यास आणि त्यात शानदार सेल्फी कॅमेरापासून दमदार बॅटरी इच्छित असल्यास तर बाजारात असे बरेच पर्याय उपलब्ध आहे जे आपल्या गरजा पूर्ण करू शकतात. त्यासाठी आपल्याला अधिक पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही आहे. 
 
काय आपल्याला अशा स्मार्टफोनबद्दल माहिती आहे ज्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आहे? चला जाणून घेऊ या. 
 
1. Nokia 5.1 Plus - या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 8,999 रुपये आहे. या फोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल मेमरी आहे. यात एचडी डिस्प्ले आणि त्याची बॅटरी 3060 एमएएच आहे.
 
2. Honor 9N - हे स्मार्टफोन आपण ऑफरमध्ये 8,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या किमतीत आपल्याला 3 जीबी रॅमसह 32 जीब इंटरनल मेमरी व्हेरिएंट मिळेल. 
 
3. Samsung Galaxy A10 - सॅमसंगच्या या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 8,490 रुपये आहे. यात 6.2-इंच इंफिनिटी व्ही डिस्प्ले आहे.
 
4. Redmi Note 7 - या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपयांपासून सुरू आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅम असलेले 32 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.
 
5. Samsung Galaxy M10 - सॅमसंगच्या या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 10,990 रुपये आहे, जेव्हा की Galaxy M10 आपल्याला 7,990 रुपयात मिळेल. M20 चे दोन व्हेरिएंट्स 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजचे आहे. 
 
6. Realme 3 - हे स्मार्टफोन 12 मार्च रोजी फ्लिपकार्टवर विक्रीसाठी येणार आहे. या फोनची प्रारंभिक किंमत 8,999 रुपये आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅम असलेले 32 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. दुसर्‍या व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती