शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

गुरूवार, 7 मार्च 2019 (19:51 IST)
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव राहणार नाही. तर जाणून घ्या तुमच्या या भागांवर तीळ आहे का?   
 
1. नाभीवर तीळ - 
समुद्रशास्त्रात पोटावर तीळ असणे चांगले नाही मानले जाते. हे व्यक्तीच्या दुर्भाग्याचे सूचक आहे. अशे व्यक्ती खाण्या पिण्याचा शौकीन असतो. पण तीळ जर नभीच्या जवळपास असतो तर त्या व्यक्तीला धन समृद्धीची प्राप्ती होते.  
 
2. पाठीवर तीळ  
पाठीवर असलेला तीळ व्यक्तीच्या रोमँटिक असल्यासोबत धनवान होण्याचा सूचक असतो. असा व्यक्ती खूप पैसा कमावतो आणि खूप खर्च ही करतो.  
 
3. पायाच्या अंगठ्यावर तीळ 
पायाच्या अंगठ्यावर तीळ असणे म्हणजे तुम्ही समाजात प्रतिष्ठित आणि संपन्न व्यक्ती असाल.  
 
4. तर्जनी बोटावर तीळ 
ज्या व्यक्तीच्या तर्जनी बोटावर तीळ असतो तो धनवान असतो पण शत्रूंपासून त्याला त्रास असतो.  
 
5. नाभीच्या खाली तीळ  
ज्या व्यक्तीच्या नाभीच्या खाली तीळ असतो त्याला पैसांची कमी नसते.  
 
6. भुवयांच्यामध्ये तीळ  
भुवयांच्यामध्य भागात तीळ असणे फारच शुभ मानले गेले आहे. हे दांपत्य जीवन तसेच धन धान्यासाठी देखील उत्तम मानले गेले आहे.  
 
7. नाकाच्या उजवीकडे तीळ  
ज्यांच्या नाकाच्या उजवीकडे तीळ असतो त्यांना कमी मेहनत करून देखील धनलाभ मिळत असतो. ते लोक फार भाग्यशाली असतात. 
 
8. हनुवटी वर तीळ 
ज्या व्यक्तीच्या हनुवटीवर तीळ असतो त्यांना कधीपण पैशांचा अभाव राहत नाही कारण त्यांच्या आयचे साधन बनून राहत.    
 
9. अनामिका बोटावर तीळ 
अनामिका बोटाच्या मध्ये तीळ असणे व्यक्तीला धनवान आणि यशस्वी बनवतो.   
 
10. सर्वात लहान बोटावर तीळ  
सर्वात लहान बोट अर्थात कन‌िष्ठ‌कावर तीळ असले तर व्यक्ती संपत्त‌िशाली तर असतो पण त्याच्या जीवनात अडचणी आणि अशांती असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती