मनीलांड्रिंग केसमध्ये ईडीसमोर उपस्थित झाल्या चंदा कोचर

सोमवार, 4 मार्च 2019 (12:50 IST)
ICICI Bank-Videocon loan case आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर प्रवर्तन निदेशालय (ED)च्या मुंबई ऑफिस चौकशीसाठी पोहोचल्या आहेत. या अगोदर शनिवारी देखील चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर बँक फसवणुकीशी निगडित धन-शोधन प्रकरणात प्रवर्तन निदेशालय समोर उपस्थित झाले होते.
 
अधिकार्‍यांनी दिलेल्या वृत्तानुसार चौकशी अधिकारी धनशोधन रोकथाम अधिनियम (पीएमएलए)मध्ये कोचर आणि त्यांचे पतीचे विधान दर्ज होतील. याअगोदर ईडीने शुक्रवारी चंदा कोचर यांच्या मुंबई आणि वीडियोकॉन समूहाचे वेणुगोपाल धूत यांच्या औरंगाबाद स्थित जागांवर धाड घातली होती. अधिकार्‍यांनी सांगितले की एकूण पाच परिसरांवर चौकशी करण्यात आली आहे.
 
असे कयास लावण्यात येत आहे की व्हिडिओकॉन समूहाचे प्रवर्तक धूत देखील शनिवारी प्रवर्तन निदेशालयाच्या समोर चौकशीसाठी उपस्थित होऊ शकतात. ईडी ने या वर्षाच्या सुरुवातीत कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, धूत आणि इतर लोकांच्या विरुद्ध मनी लॉंडरिंग कायदाच्या तहत एक गुन्हेगारी प्रकरण नोंदवला होता. प्रकरण  आयसीआयसीआय बँक द्वारे व्हिडिओकॉन समूहाला 1,875 कोटी रुपयांचे ऋण देण्यात अनियमिता आणि भ्रष्ट व्यवहाराची देखील तपासणी होणार आहे.
 
अधिकार्‍यांनी सांगितले की प्रकरणात अधिक पुराव्यांच्या शोधात ईडीने शुक्रवारी सकाळी ही धाड घातली होती. यात पोलिसांनी ईडीची मदत केली.
 
सीबीआय द्वारे दर्ज प्रकरणात चंदा कोचर, दीपक कोचर, धूत आणि त्यांची कंपनी व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (वीआईईएल) आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड (वीआईएल) यांना नामजद करण्यात आले आहे. सीबीआय ने प्रथमादृष्ट्या धूत यांची एक अजून कंपनी सुप्रीम एनर्जी आणि दीपक यांचे नियंत्रण असणारी न्यूपावर रीन्यूएबल्सला देखील नामजद केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती