Poco M5 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
आगामी Poco M5 हा 4G फोन असेल. मात्र, त्याचा 5G प्रकारही लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. Poco ने या स्मार्टफोनच्या डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्ससाठी एक समर्पित पेज देखील तयार केले आहे. डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, Poco M5 कंपनीच्या लोकप्रिय पिवळ्या रंगात येईल.
याशिवाय, यात 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे. या फोनमध्ये टर्बो रॅम फीचर देखील सपोर्ट करण्यात आला आहे. Poco M5 मध्ये 90Hz 6.58-इंच फुल- एचडी + स्क्रीन आहे. त्याचा टच सॅम्पलिंग रेट 240Hz आहे. एका लीकमध्ये रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की यामध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.