कमी कालावधीतच चीनच्या OnePlus या प्रिमिअम स्मार्टफोन कंपनीने सॅमसंग, अॅपलला टक्कर दिली आहे. मात्र, या कंपनीचे फोन 35 ते 50 हजाराच्या रेंजमध्ये उपलब्ध असल्याने सामान्य ग्राहकांना परवडणारे नव्हते. यामुळे वनप्लसने कमी किंमतीचा फोन भारतीय बाजारासह जगभरात उतरविण्याचे ठरविले आहे. यानुसार OnePlus Z हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाणार आहे.
कंपनीने या फोनची अधिकृत माहिती दिलेली नसली तरीही वनप्लसचे सह संस्थापक कार्ल पे यांनी ट्विटकरून या डिव्हाईसचे संकेत दिले आहेत. या ट्विटवरून नव्या OnePlus Z च्या किंमतीचा अंदाज येत आहे. ट्वीटनुसार 299 डॉलर (22,799 रुपये) या फोनची किंमत असणार आहे. हा फोन जुलैमध्ये लाँच केला जाऊ शकतो. कार्ल पे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये 2014 मध्ये केलेले कंपनीचे एक जुने ट्विट एम्बेड आहे. हे ट्विट तेव्हाचे आहे जेव्हा कंपनीने पहिला वनप्लस One लाँच केला होता. या ट्विटमध्ये फोनचे नाव तर नाही घेतले गेलेय परंतू नव्या फोनची किंमत पहिल्या वनप्लसएवढी असण्याची शक्यता आहे.
कंपनीने 299 डॉलरला हा स्मार्टफोन लाँच केला होता. ही किंमत फोनच्या 16 जीबी मॉडेलची होती. या ट्विटनंतर उडालेल्या अफवांनुसार अॅपलचा आयफोन SE आणि गुगलच्या Pixel 4a ला टक्कर देण्यासाठी हा स्वस्त अँड्रॉईड फोन आणला जाणार आहे. जर या फोनची किंमत 299 डॉलर असेल तर तो आयफोन एसईपेक्षा 100 डॉलर आणि पिक्सल 4ए पेक्षा 50 डॉलरने स्वस्त असणार आहे. सध्या वनप्लसचा कोणताही फोन iPhone SE ला टक्कर देत नाही. वनप्लसने नुकतेच वनप्लस 8 आणि वनप्लस 8 प्रो फोन लाँच केले आहेत. ते iPhone 11 आणि गॅलेक्सी S20 चे प्रतिस्पर्धी आहेत.