सीबीआयने राज्यातील पोलीस खात्यांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी एका मालवेअरवर (व्हायरस) लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. इंटरपोलने दिलेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने हा इशारा जारी केला आहे. करोनासंदर्भातील माहिती आणि लिंक असल्याचे सांगून अनेक स्मार्टफोनमधून सर्बेरस (Cerberus) या ट्रोजनच्या माध्यमातून खासगी माहिती चोरली जात आहे. फिशींग (phishing) प्रकारच्या या सायबर हल्ल्याच्या माध्यमातून आर्थिक लूट केली जाते असं सांगण्यात आलं आहे. बँकिंगशी सबंधित सर्बेरस (Cerberus) या ट्रोजनसंदर्भात हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.