चक्रीवादळ नव्हे आता 'अम्फान'चे सुपर चक्रीवादळात रूपांतर

मंगळवार, 19 मे 2020 (17:08 IST)
'अम्फान' वादळाचे सुपर चक्रीवादळात रूपांतर झाल्याने पश्चिम बंगाल, ओडिशातील किनारपट्टी भागाला तडाखा बसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बुधवारी हे चक्रीवादळ तीव्र वेगाने पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीभागात धडकेल, असा अंदाज विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिण बंगालच्या खाडीत पश्चिम-मध्य, आजूबाजूच्या मध्य क्षेत्रावरून जवळपास ११ किलोमीटर ताशी वेगाने हे वादळ उत्तरेच्या दिशेने येत आहे. सुपर चक्रीवादळामुळे काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आहे.
 
सुपर चक्रीवादळामुळे १८ ते १९ मे पर्यंत २३० रस २४० किलोमीटर ताशी वेगाने तर, २०  मे ला १८० ते १९०  किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील. २१ मे पर्यंत दबाब निर्माण होवून वादळाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. 
 
उत्तर-उत्तर पूर्व दिशेने येणा-या या चक्रीवादळ उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीसह पश्चिम बंगाल-बांगलादेशच्या किनारपट्टी भागातील दीघा, पश्चिम बंगाल तसेच हटिया बेटसमूह, बांगलादेश दरम्यान सुंदरबन नजीक २० मे ला दुपारी हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. 
 
सुपर चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात १६५ ते १७५ किलोमीटर ताशी वेगाने धडकेल. वार्यांचा वेग किमान १९५ किलोमीटर ताशी वेगाने राहील, अशी शक्यता विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. सोबतच ओडिशाच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती