अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी आपल्या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरऐवजी फेस आयडी सेन्सर देण्यास सुरुवात केली होती पण कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे अनिवार्य असून अशात फोन अनलॉक करणं अशक्य होत होतं. तर दुसरीकडे मास्क काढून फोन अनलॉक करणे किंवा पासवर्डच्या सहाय्यानं फोन अनलॉक करणे दोन पर्याय होते. परंतू आता Apple ने आपल्या नव्या iOS 14.5 च्या बीटा व्हर्जनमध्ये ही समस्या सोडवण्यचा प्रयत्न केला आहे. हे र्व्हजन डाउनलोड केल्यानंतर जरी युझरनं मास्क परिधान केला असेल तरी त्याला आपला फोन अनलॉक करता येणार आहे.