नोकियाचे अँड्रॉईडमध्ये पदार्पण!

PR
बार्सिलोना- आघाडीची मोबाईल निर्माता कंपनी नोकियाने अखेर अँड्रॉईड फोनच्या दुनियेत पदार्पण केले आहे. बार्सिलोनामध्ये सुरु असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2014 मध्ये कंपनीने नोकिया एक्स, नोकिया एक्स प्लस आणि नोकिया एक्स एल हे आपले पहिले अँड्रॉईड फोन लॉन्च केले आहेत.

नोकियाचे हे तीनही बजेट स्मार्टफोन असल्याचे कंपनीने सांगितले आहे. नोकिया एक्सची किंमत सुमारे 7,565 रुपये, एक्स प्लसची 8,415 रुपये आणि एक्स एलची 9,265 रुपये असेल.

नोकिया एक्स आणि एक्स प्लसमध्ये गूगल प्ले स्टोअर इन्स्टॉल नाही. पण यान्डेक्स स्टोअरवरुन या दोन्ही फोनमध्ये अँड्रॉईड अॅप्स डाऊनलोड करता येऊ शकतात.

वेबदुनिया वर वाचा