टॅबपेक्षा फॅबला अधिक पसंती

गुरूवार, 13 मार्च 2014 (18:20 IST)
टॅबलेटची वेगाने वाढणारी बाजारपेठ म्हणून भारताची ओळख आहे. मात्र सध्या फॅबलेटला अधिक पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. बीआयएस निकष आणि ‘फॅबलेट’ची वाढती मागणी यामुळे 2014 मध्ये टॅबलेटची बाजारपेठ स्थिर राहील असा अंदाज आयडीसीने व्यक्त  केला आहे.
 
स्मार्टफोन आणि टॅबलेटचे एकत्रित नवीन रूप म्हणजे फॅबलेट. आशिया पॅसिफिक आणि चीनमध्ये टॅबलेटचा सर्वाधिक प्रसार आहे. ब्राझील, भारत आणि रशिया या वेगाने वाढणार्‍या टॅबलेटच्या बाजारपेठा आहेत. गेल्या वर्षी भारतात टॅबलेटची विक्री 56.4 टक्क्यांनी  वाढली. 2012 मध्ये 2.66 दशलक्ष टॅबची विक्री झाली होती. ती 2013 मध्ये 4.14 दशलक्ष झाली आहे. मायक्रोमॅक्स, लावा आणि अन्य इतर कमी किमतीच्या टॅबच्या उपलब्धतेमुळे या बाजारपेठेत तेजी आली. मात्र सरकारने केलेली बूरो ऑफ इंडियन स्टँडर्डसच्या प्रमाणपत्राची अनिवार्यता फॅबलेटच्या मागणीच्या पथ्यावर पडली असून यामुळे टॅबलेटची वाढ रोखली आहे.

वेबदुनिया वर वाचा