जिओनीच्या मोबाइलमध्ये ‘डय़ुएल व्हॉटस्अँप’

सोमवार, 7 मार्च 2016 (15:42 IST)
डय़ुअल सीमकार्ड आहे पण डय़ुएल व्हॉटस्अँपची सुविधा नाही अशी तक्रार आता करता येणार नाही कारण जिओनीने नुकताच एक नवा फोन लॉन्च केला असून त्यात ‘डय़ुएल व्हॉटस्अँप’ फिचरची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. स्पेनमधील बर्सिलोना येथे सुरू असलेल्या ‘ट्रेड शो एमडब्लूसी 2016’ मध्ये सोमवारी कंपनीने ‘जिओनी एस 8’ हा मोबाइल लॉन्च केला आहे. 
 
या मोबाइलची किंमत 34 हजार रुपये असून तो मार्चपासून बाजारात उपलब्ध होणार आहे. रोज गोल्ड, सिल्व्हर गोल्ड आणि गोल्ड या तीन कलरमध्ये मोबाइल उपलब्ध होणार आहे. या मोबाइल फोनमध्ये नवीन 3डी टच प्रेसर डिस्प्ले फीचर सुविधा देण्यात आली आहे. 
 
(ही सुविधा अँपलच्या आयफोनमध्ये नाही) स्मार्टफोन एस8 हा फोर जी कनेक्टिव्हिटी असून डय़ुएल सीम (मायक्रो सीम) सपोर्ट करणार असून यामध्ये डय़ुएल व्हॉटस्अँप आणि डय़ुएल वूईचॅट सारखे फीचर उपलब्ध करण्यात आले. 
 
ही या फोनची खास वैशिष्टय़े आहेत. मोबाइल वापरणार्‍या व्यक्तींना एकाचवेळी डय़ुएल हॉटस्अँप वापरता येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा