अ‍ॅपलचे आयफोन 6S, 6S प्लस लाँच

गुरूवार, 10 सप्टेंबर 2015 (11:45 IST)
सॅन फ्रान्सिस्को- अॅपल कंपनीने त्यांचे बहुप्रतीक्षित 6S आणि 6S प्लस हे दोन नवे आयफोन लाँच केले. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या एका भव्य सोहळ्यात या दोन नवे आयफोनसह आयपॅड प्रो, अॅपल पेन्सिल आणि अॅपल टीव्हीही सादर करण्यात आले.
 
आयफोनचा डिस्प्ले तीन प्रकारचे टच (टॅप, प्रेस आणि डीपर प्रेस)  जाणू शकतो. हे हँडसेट गोल्ड, स्पेस ग्रे, सिल्व्हर व रोझ गोल्ड रंगात सादर केले गेले आहेत. हे दोन्ही फोन 16 GB, 32 GB आणि 64 GB अशा तिन्ही वेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. यात 12 मेगापिक्सलचा रियर व 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून यावर चार हजार व्हिडीओ रेकॉर्ड करता येणार आहेत. 
 
आयफोन 6S प्लससाठी 5.5 इंची स्क्रीन थ्रीडी तर 6S साठी 4.7 इंजी स्क्रीन व मल्टीटच सुविधा देण्यात आली आहे. 
 
6S साठी 16 GB ची किंमत 649, 32 GB ची किंमत 749 तर 64 GB ची किंमत 849 डॉलर्स आहे. तर 6S प्लससाठी याच किंमती अनुक्रमे 749, 849, 949 डॉलर्स अशा आहेत.
 
अमेरिकेत 12 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डर सुरू होणार आहे. भारतातील ग्राहकांना मात्र हे फोन खरेदी करण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच वर्षाअखेरपर्यंत आयफोन 130 देशांमध्ये लाँच होईल.

वेबदुनिया वर वाचा