Ghatasthapana 2023 Muhurat घटस्थापना 2023 शुभ मुहूर्त

रविवार, 15 ऑक्टोबर 2023 (09:45 IST)
Ghatasthapana Muhurat 2023 Navratri: 15 ऑक्टोबर 2023 रोजी शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरू होत आहे. तर येथे जाणून घ्या कोणत्या तारखेपासून तुम्ही घटस्थापना करून नवरात्रीचे नऊ दिवस साजरे करू शकता.
 
घटस्थापना 2023 मुहूर्त:
शारदीय नवरात्री घट स्थापना शुभ मुहूर्त 2023:
प्रतिपदा तिथी प्रारम्भ- 14 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11:24 पासून
प्रतिपदा तिथी समाप्त- 16 ऑक्टोबर 2023 दुपारी 12:32 पर्यंत
 
नवरात्रौत्सवाला 15 ऑक्टोबर रविवारपासून सुरूवात होत आहे.
 
घट स्थापना शुभ मुहूर्त : 15 ऑक्टोबर दुपारी 12:01 ते 12:48 दरम्यान
अमृत काल मुहूर्त : सकाळी 11:20 ते दुपारी 01:03 पर्यंत
अमृत काल चौघड़िया : सकाळी 10:56 ते 12:24 पर्यंत
अभिजीत मुहूर्त : दुपारी 12:01 ते 12:48 पर्यंत
संध्याकाळ पूजा मुहूर्त : संध्याकाळी 06:16 ते 07:30 दरम्यान
निशीथ काल मुहूर्त : मध्यकाल रात्री 12:00 ते 12:49 पर्यंत (16 ऑक्टोबर)
 
घटस्थापनेसाठी आवश्यक साहित्य
फुलांची माळ
लाल वस्त्र
अक्षता
आंब्याची पाने
नारळ
सुपारी आणि कुंकु
कलश, गंगाजल किंवा शुद्ध पाणी
सप्तधान्य (7 प्रकाराचे धान्य)
मातीचे भांडे
पवित्र जागेची माती
 
या प्रकारे करा घटस्थापना
एका परडीमध्ये काळी माती घ्यावी. या मातीमध्ये धान्य पेरावे. त्यावर पाण्याने भरलेला एक घट ठेवावा. या घटात आंब्याची पाने ठेवावी. त्यावर नारळ ठेवावा. देवीचे टाक ठेवावे. त्याच्यापुढे पाच फळे ठेवावी. या घाटाला फुलांची माळ घालावी.
 
घट स्थापित करत असलेल्या जागेवर एक चौरंग आणि त्यावर स्वच्छ लाल कापड पसरुन त्यावर घट स्थापना करावी. घटावर रोली किंवा चंदनाने स्वस्तिक आखावे. घटाला मौली बांधावी.
 
कलश स्थापना विधी
दुर्गा देवीची मूर्ती किंवा तसबीर स्थापन करुन मातीवर कलश ठेवावा. अक्षता, फूल आणि गंगाजल घेऊन वरुण देवतेचे आवाहन करावे. कलशात सर्वोषधी तसेच पंचरत्न ठेवावे. कलशाखाली असलेल्या मातीत सप्तधान्य (जव, तीळ, तांदूळ, मूग, चणे, गहू, बाजरी) आणि सप्तमृतिका मिसळावे. आंब्याची पाने कलशात ठेवावी. कलशावर एका पात्रात धान्य भरून त्यावर एक दीप प्रज्ज्वलित करावा. नंतर कलशावर लाल रंगाचे वस्त्र गुंडाळून नारळ ठेवावा. कलशाखाली असलेल्या मातीत जव पसरावे. यानंतर देवीचे ध्यान करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती