श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय १८
सोमवार, 18 जानेवारी 2021 (11:32 IST)
श्रीगणेशायनमः ॥ तत्रैवसर्वतीर्थानीयत्रास्तेजगदंबिका ॥ मंगलनिचतत्रैवयत्रांवापुज्यतेऽनिशां ॥१॥
ऋषीगणपुसतीस्कंदाप्रती ॥ दीएसीपुजावयाचीपद्धती ॥ कोणतेमासींकोणतेतिथी ॥ कोणतेवारींपुजावें ॥२॥
पुजनकेलीयाकायफळ ॥ पुजकासीहोयसकळ ॥ तेंत्वासांगावेंप्रांजळ ॥ कृपाकरुनीषण्मुखा ॥३॥
स्कंदम्हणेबरोबहुत ॥ तुमचानिश्चयदृढतरयुक्त ॥ त्वरितांदेवचीपुजानिश्चित ॥ करुंडच्छीतायेवेळीं ॥४॥
प्रश्नकेलाहालोकोत्तर ॥ तुम्हींउपकारकेलाथोर ॥ तरीसांगेनसविस्तर ॥ स्वस्थचित्ताऐकातुम्हीं ॥५॥
मासपक्षतिथीवार ॥ विशेषपुजेचाप्रकार ॥ ज्याकालीजेउपचार ॥ करिताफलप्राप्तिहोय ॥६॥
तेंसांगेनसविस्तर ॥ तुम्हींऐकावेंएकाग्र ॥ अश्विनीशुक्लप्रतिपदाथोर ॥ पर्वनवरात्रपुजेचें ॥७॥
आरंभप्रतिपदेदिवशीं ॥ पूर्वाण्हींकरावेंपुजेसी ॥ शुचिर्भूतनियतमानसीं ॥ घटसंस्थापनकरावें ॥८॥
प्रतिपदेपसुननऊदिन ॥ नवमीपर्यंतकरावेंपुजन ॥ अमावस्याविद्धप्रतिपदाजाण ॥ वर्जकरावीपूजेसी ॥९॥
अमावास्यायुक्तप्रतिपेदसी ॥ मोहेंकरीलघटस्थापनेसी ॥ तरीकर्त्याच्याजेष्ठपुत्रासी ॥ विनाशप्राप्तहोईल ॥१०॥
अमावास्यासरल्यावर ॥ जीप्रतिपदालागणार ॥ प्रथमसोळाघटकासाचार ॥ किंवाद्वादशवर्जाव्या ॥११॥
शुद्धप्रतिपदतीनमुहूर्त ॥ तेव्हांघंटास्थापनायुक्त ॥ परीचित्रावैधृतीव्यातिपात ॥ संक्रातियुक्तवर्जावें ॥१२॥
तेव्हांप्रतिपदाअमायुक्त ॥ घेतांदोषनाहींकिंचित ॥ प्रथमसोळाघटावर्जित ॥ करूनीस्थापनाकरावी ॥१३॥
शुद्धप्रतिपदादिवसभर ॥ आणिचित्रादिकुयोगहिविळभर ॥ तरीप्रातःकाळींचस्थापनकर ॥ कुयोगाचादोषनाहीं ॥१४॥
माध्यान्हपर्यंतकाळ ॥ कुयोगटाळवयाकेवळ ॥ नटळेतरीपूर्वाण्हकाळ ॥ तोचिउचितपुजेसी ॥१५॥
वर्जापराण्हकाळसदा ॥ तैसेचामायुक्तप्रतिपदा ॥ यास्तवकर्माचीमर्यादा ॥ ज्ञानीब्राह्मणाविचारावी ॥१६॥
जीपूर्वरात्रीदेवाची ॥ मध्यरात्रीतीराक्षसाची ॥ शेषरात्रीतीदेवीची ॥ तोपुजाविधीसयोग्यकाळ ॥१७॥
प्रतिपदानवमी मध्यवतीं ॥ जेव्हांयेईलदिनक्षयतिथीं ॥ तेव्हांअमाप्रतिपदासंधीप्रती ॥ शेषरात्रींपूजाकरावीं ॥१८॥
होईलदिनवृद्धिनिश्चिती ॥ तरीअष्टमीसीसमाप्ती ॥ समानदिवसजरीअसती ॥ तरीनवमीसीसमाप्तीकरावी ॥१९॥
सप्तमृत्तिकाधान्यसप्तक ॥ स्थापनेसीपाहिजेअवश्यक ॥ सप्तमृत्तिकेचाविवेक ॥ आधींऐकासांगतो ॥२०॥
अश्वस्थानगजस्थान ॥ वाल्मीकनदीसंगमन ॥ जलद्रदराजद्वारप्रदेशजाण ॥ सप्तमृत्पिकाजाणाव्या ॥२१॥
मुद्रमाषाप्रियंगुधी ॥ यवातिळगोधूमसप्तधान्येहीं ॥ आम्रउदूंबरजांबंळवटही ॥ अशोकपंचपल्लवहे ॥२२॥
सगुच्छपल्लवकोमल ॥ पंचत्वचाअंतरसाल ॥ हिरामाणिकमौत्किकप्रवाळ ॥ पुष्परागपंचरत्नें ॥२३॥
कस्तुरीचंदनकोष्ट ॥ कर्पुरागरुउशीरगोरोचनकेशर ॥ अष्टगंधासावेसुंदर ॥ अष्टधातुत्याऐका ॥२४॥
सुवर्णरजतताम्रकासें ॥ पितळवंगकृष्णलोहविशेषें ॥ केवळलोहमिळोन ऐसें ॥ अष्टधातुजाणाव्या ॥२५॥
बहुरंगाचींविविधवस्त्रें ॥ कलशनुतनदृढअच्छिद्र ॥ स्थूलनूतनदीपपात्र ॥ आछिद्र असलेंपाहिजे ॥२६॥
नऊपदरतंतुचीवाती ॥ हस्तद्वयप्रमाणनिरुती ॥ प्रज्वलित्दीपाअहोराती ॥ अखंडासल्यापाहिजे ॥२७॥
गोमुत्रगोमयगोक्षीर ॥ दघीघृतकुशयुक्तनीर ॥ सव्यघटकयुक्तपात्र ॥ प्रथककरोनीठेवावें ॥२८॥
दुग्धदधीशर्करायुक्तमद ॥ हेपंचामृतपुजसीप्रसिद्ध ॥ वेगळालेंपात्रीशुद्ध ॥ संपादुनीठेवावें ॥२९॥
देवीयंत्रसुवर्णाचे ॥ रजतकिंवाताम्राचें ॥ पात्रावरीलेखनसाचें ॥ अथवभूर्जपत्रावरी ॥३०॥
कस्तुरीकिंवाअष्टगंधानें ॥ यंत्रशास्त्राधाराप्रमाणें ॥ लेखनकरावेंज्ञात्यानें ॥ सर्वसिद्धिदायक ॥३१॥
कल्लोलजळींकरुनीस्नान ॥ करावेंशुभ्रवस्त्रपरिधान ॥ जितेंद्रियहोऊनपूजन ॥ गुरुदर्शितमागेंकरावें ॥३२॥
देवीच्यासन्मुखउत्तमजाण ॥ मृत्तिकेचेंआलबालकरुन ॥ त्यांतसप्तधान्येंमिळवुन ॥ त्यावरीकुंभठेवावा ॥३३॥
शुद्धजळेंपूर्णकरून ॥ पंचपल्लवपंचरत्न ॥ पंचऔषधीकुंभांतघालून ॥ त्यावरीवस्त्रघालावें ॥३४॥
देवीदक्षिणप्रदेशांत ॥ घृतवतींदीपप्रज्वलित ॥ स्थापनकरोनीनिश्चित ॥ पुजनकरावेंदेवीचें ॥३५॥
पंचगव्यपंचामृतपूर्ण ॥ शुद्धोदकेंअभिषेककरुन ॥ वस्त्रालंकारकेशरचंदन ॥ हरिद्राकुंकुमपुष्पादि ॥३६॥
धृपदीपनैवेद्यपक्कान्न ॥ देवीसीकरावेंअर्पण ॥ नानाविधफलेंअर्पून ॥ तांबुलसमर्पणकरावें ॥३७॥
दक्षणप्रदक्षणघालून ॥ मंगलाअरतीओवाळुन ॥ गीतवाद्यनृत्यकरुन ॥ संतुष्टरावीजगदंबा ॥३८॥
कुमारीचेंकरावेंपुजन ॥ प्रतिदिवशींअधिकजाण ॥ कुमारीबहुतमिळवुन ॥ पुजनकरावेंभक्तिनें ॥३९॥
प्रदोषकाळींबळीदान ॥ मद्यमाम्शेकरावेंत्यालागुन ॥ क्षत्रियादिकांसाधिकारजाण ॥ त्यांनीकरावेंभक्तीनें ॥४०॥
ब्राह्मणवेदपारायण ॥ अगमोक्तमंत्रपुराणपठण ॥ नवनारायणीपुजन ॥ नवदुर्गापुजनकरावें ॥४१॥
बहुतकुमारींचेंपुजन ॥ ऐकेकनामामंत्रेंकरुन ॥ एकेकमुमारींचेअर्चन ॥ भक्तिभावेंकरावें ॥४२॥
रात्रींदीपावळीलावून ॥ देवीसिकरावेंनिराजन ॥ ऐसेंनऊदिवसकरुन ॥ होमकरावाशेवटीं ॥४३॥
चतुरस्त्रवर्तुलकुंडजाण ॥ होमसंख्यापाहुनविस्तीर्ण ॥ करावेंतीळपायसादिद्रव्येंकरुन ॥ घृतयुक्तबिल्वपत्रानें ॥४४॥
देवीमत्रेंकरावेंहवन ॥ शेवटीसौभाग्यद्रव्यामिसळोन ॥ पूर्णाहुतिघालावी ॥४५॥
भाषभक्तबलिदान ॥ मांत्रिकेंकरावेंलोकपालसीजाण ॥ सार्वभौक्तिकक्षेत्रपालजाणुन ॥ बलीसमर्पणकरावा ॥४६॥
यथासांगकरावयापुजन ॥अनुकुलक्षत्रियनृपासीपरिवार ॥ त्यांनींसुरामांसेंबलीदान ॥ योगिनीसीपृथकपृथककारावें ॥४७॥
अमात्यप्रधानपरिवार ॥ मध्येंनृपासीबिअसवोनीसाचार ॥ घटोदकेंअभिषेकसुंदर ॥ ब्राह्मणेम्करावामंत्रानें ॥४८॥
होमकर्मसमाप्तकरुन ॥ बहुब्राह्मणासद्यावेंभोजन ॥ बहुसुवासिनीबहुकुमारीजाण ॥ पुजूनभोजनघालावें ॥४९॥
बहुपक्कान्नसुरसअन्न ॥ करूनियांसंतर्पण ॥ दीनअन्नार्थीअनाथांलागुन ॥ येथेष्टभोजनघालावें ॥५०॥
अनेकविधदानदेऊन ॥ संतुष्टकरावेयाचकजन ॥ रात्रींदेवीचीपुजाकरुन ॥ घटोत्थापनकरावें ॥५१॥
अष्टमीविद्धनवमीजाण ॥ करोनयेविसर्जन ॥ दशमीविद्धनवमीपूर्ण ॥ योग्यविसर्जनकरावया ॥५२॥
याप्रमाणेंनवरात्रविधी ॥ सांगकथिलेंनिरवधी ॥ बहएरमिरवणेंप्रसिद्धी ॥ उत्तराध्यायींतीकथा ॥५३॥
म्हणेपांडुरंगजनार्दन ॥ पुढेंकथारसाळपूर्ण ॥ श्रोतेकरावयाश्रवण ॥ सादरअसावेंप्रमानें ॥५४॥
इतिश्रीस्कंपुराणेसह्याद्रीखंडें ॥ तुरजामाहात्म्यें ॥ शंकरवरिष्टसंवादे ॥ अष्टदाशोध्यायः ॥१८॥
श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥