पौष शुद्ध अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमीपासून शाकंभरी नवरात्र सुरू होत असून पौर्णिमेपर्यंत असतं. शाकंभरी नवरात्र खूप महत्त्वाची मानली जाते. देवीस्तुतीच्या अकराव्या अध्यायात आदिशक्तीच्या ज्या रुपांचं वर्णन केलंय, त्यातीलच एक महत्त्वाचं हे रूप असून या देवीला आदिशक्तीचंच एक रूप मानलं जातं. शाकंभरी देवीला चार भुजांची आणि काही ठिकाणी अष्टभुजा रुपात दर्शवलं गेलं. शाकंभरी नवरात्रात देवी अन्नपूर्णेची साधना केली जाते. आपल्याला नावावरूनच लक्षात येईल की, शाकंभरी देवी म्हणजे अन्न-देवता. संपूर्ण ब्रह्मांड देवीचं मूल आहे. जाणून घ्या देवीच्या या अनोख्या रुपाची कथा आणि शाकंभरी नवरात्रातील पूजा विधीबद्दल...
एकदा पृथ्वीवर 100 वर्षे पाऊस न झाल्यानं दुष्काळ पडला होता. पृथ्वीवर खाण्यासाठी अन्नाचा एकही दाणा उपलब्ध नव्हता. या समस्येमुळे त्रासलेल्या ऋषींनी आदिशक्तीचं स्तवन केलं. त्यांच्यावरील संकट बघून देवीनं अयोनिजाचं रूप घेतलं. या अवतारात देवीला 100 डोळे होते. आपल्या 100 डोळ्यांनी देवीनं ऋषी आणि सामान्यांचे दुःख बघितले. यानंतर आपल्या सर्व मुलांचे कष्ट दूर करण्यासाठी देवी शाकंभरी रूपात प्रकटली. देवीचं हे विराट रूप होतं. या रुपामध्ये देवीच संपूर्ण शरीरावर विविध प्रकारची झाडं आणि भाज्या होत. जोपर्यंत पाऊस पडला नाही, तोपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर शाकंभरी देवीनं आपल शरीरावरील भाज्या, झाडांमुळे सर्वांचे प्राण वाचविले.
ऋग्वेदाच्या सौभाग्लक्ष्मी उपनिषदामध्ये श्रीसूक्त दिले. त्यात लक्ष्मीला पद्मा, पद्मिनी, पद्मस्थिता, पद्मवर्णा, पद्मसंभवा या शब्दांनी वर्णिले आहे. महेश त्या सृष्टीचा प्रलयकाळी संहार करतात. ही शक्ती सोळा कलांनी संहार करते म्हणून तिला षोडशीदेखील म्हणतात. संपूर्ण जगाची ही अधिष्ठात्री आहे. हिला चिदग्रिकुण्डसंभुता असं म्हटलं आहे. ही स्थूल सूक्ष्म आणि कारणरुप शरीरात वास करते. शिवाचे शिवत्व इकाररुप शक्तीमुळे असते. यामुळेच शक्तीला देवता म्हटले आहे.