मंगळवारचे हे उपाय भक्तांच्या जीवनातील कष्ट नाहीसे करतात

मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024 (06:58 IST)
मंगळवार हनुमानाला समर्पित आहे. या दिवशी गणपतीची पूजा करणे देखील शुभ मानले गेले आहे. हा दिवस कर्ज मुक्तीसाठी सर्वात उत्तम असल्याचा मानला गेला आहे. मंगळवारचा थेट संबंध मंगळ ग्रहाशी आहे. मंगळ ऊर्जेचा कारक मानला गेला आहे. शास्त्रांमध्ये मंगळवारी हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहे. जाणून घ्या मंगळवाराशी निगडित काही उपाय-
 
1. मंगळवारी राम मंदिरात दर्शनासाठी जावे. हनुमानाचे दर्शन घेऊन प्रभू श्रीराम आणि सीता देवीचे दर्शन घेणे शुभ ठरतं. यादिवशी दर्शनमात्रने बजरंगबली आपली इच्छा पूर्ण करतात.
 
2. हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी गुलाबाची माळ किंवा केवड्याचे अत्तर अर्पित करावे.
 
3. कष्टांपासून मुक्तीसाठी हनुमानाच्या मंदिरात जाऊन राम रक्षा स्त्रोत पाठ करावे.
 
4. हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा आणि एक शुद्ध तुपाचा दिवा लावावा. हनुमान चलीसा पाठ करावं. असे केल्याने हनुमानाचे भक्त अडथळे येत असलेले कार्य पार पाडतात.
 
5. मंगळवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व कामना पूर्ण होता त आणि हनुमान भक्तांना भरभरुन धन-संपत्ती देतात.
 
6. तसे तर गायीला रोज पोळी खाऊ घालावी परंतू मंगळवारी लाल गायला पोळी देणे शुभ मानले गेले आहे.
 
7. मंगळवारी हनुमान मंदिरात नारळ ठेवणे शुभ मानले गेले आहे. याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
 
8. मंगळवारी तांबा किंवा सोनं, केसर, कस्तूरी, गहू, लाल चंदन, लाल गुलाब, शेंदूर, मध, लाल पुष्प, सिंह, मृगछाला, मसूराची डाळ, लाल कन्हेर आणि लाल दगड अशा वस्तू दान केल्याचे किंवा वापरण्याचे विशेष महत्तव आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती