Gupt Navratri 2021: गुप्त नवरात्री कधी सुरु होत आहे, घट स्थापना शुभ मुहूर्त और पूजा विधी

शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (06:53 IST)
हिंदू धर्मात गुप्त नवरात्रीचे विशेष महत्व आहे. धार्मिक मान्यतानुसार गुप्त नवरात्री तंत्र-मंत्र सिद्ध करणारी मानली गेली आहे. गुप्त नवरात्रीमध्ये पूजा केल्याने अनेक कष्टांपासून मुक्ती मिळते. गुप्त नवरात्रीमध्ये तांत्रिक महाविद्या देखील सिद्ध करण्यासाठी देवी दुर्गाची उपासना केली जाते.
 
गुप्त नवरात्री 2021 तिथी आणि घट स्थापना शुभ मुहूर्त-
 
नवरात्री शुभांरभ 12 फेब्रुवारी 2021 दिवस शुक्रवार
नवरात्री समाप्त 21 फेब्रुवारी 2021 दिवस रविवार
कलश स्थापना मुहूर्त- सकाळी 08 वाजून 34 मिनिटांपासून ते 09 वाजून 59 मिनिटापर्यंत
अभिजीत मुहूर्त- दुपारी 12 वाजून 13 मिनिटापासून ते 12 वाजून 58 मिनिटापर्यंत
 
दुर्गा देवीच्या या स्वरूपात होती पूजा-
 
कालिके, तारा देवी, त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी, माता चित्रमस्ता, त्रिपुर भैरवी, मां धूम्रवती, माता बगलामुखी, मातंगी, कमला देवी
 
गुप्त नवरात्री पूजा सामुग्री-
 
दुर्गा देवीची प्रतिमा किंवा चित्र, शेंदूर, केशर, कापुर, जवस, धूप वस्त्र, आरसा, कंगवा, कंगण- बांगड्या, सुवासिक तेल, आंब्यांच्या पत्त्यांचे तोरण, लाल पुष्प, दूर्वा, मेंदी, बिंदी, अख्खी सुपारी, हळदीची गाठ, हळद, पटरा, आसन, चौरंग, रोली, मौली, पुष्पहार, बेलपत्र, कमलगट्टा, दिवा, नैवेद्य, मधु, साखर, पंच मेवा, जायपत्री, नारळ, माती, पान, लवंग, वेलची, कळश मातीचा किंवा पितळ्याचा, हवन सामुग्री, पूजेसाठी थाळी, श्वेत वस्त्र, दूध, दही, ऋतुफळ, गंगाजल.
 
गुप्त नवरात्री पूजा विधी
गुप्त नवरात्री दरम्यान तांत्रिक आणि अघोरी दुर्गा देवीची अर्ध्या रात्री पूजा केली जाते. दुर्गा देवीची प्रतिमा स्थापित करुन कुंकु आणि सोनेरी चुनरी अर्पित केली जाते. नंतर देवीच्या चरणी पूजन सामुग्री अर्पित केली जाते. दुर्गा देवीला लाल फुलं अर्पित करणे देखील शुभ मानले गेले आहे. मोहरीच्या तेलाचा दिवा लावून 'ॐ दुं दुर्गायै नमः' मंत्र जपावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती