कोची वॉटर मेट्रो शहराच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. 1,136 कोटी रुपयांचा हा प्रकल्प केरळसाठी एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जात आहे. सार्वजनिक वाहतूक आणि पर्यटनाच्या माध्यमातून शहरातील आर्थिक उपक्रमांना चालना मिळू शकेल.
वॉटर मेट्रोवरील प्रवासाचे किमान भाडे 20 रुपये आहे, जे नियमित प्रवासी आहेत, ते बस किंवा लोकल ट्रेनसारखे साप्ताहिक आणि मासिक पास देखील घेऊ शकतात. साप्ताहिक भाडे 180 रुपये असेल, तर मासिक भाडे 600 रुपये असेल, तर तिमाही भाडे 1,500 रुपये असेल. एवढेच नाही तर प्रवाशांना एकच स्मार्ट कार्ड वापरून कोची मेट्रो ट्रेन आणि वॉटर मेट्रोमध्ये प्रवास करता येणार आहे. तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही कोची वन अॅप वापरू शकता.
वॉटर मेट्रो म्हणून चालवल्या जाणार्या बोटी कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बांधल्या आहेत. केरळ सरकारने जर्मनीच्या KFW च्या सहकार्याने या प्रकल्पाला निधी दिला आहे. यासाठी सुमारे 1,137 कोटी रुपये खर्च झाले आहेत.