दिल्लीहून भुवनेश्वरला जाणाऱ्या विस्तारा विमानात सोमवारी संध्याकाळी तांत्रिक बिघाड झाला. यानंतर दिल्ली विमानतळावर संपूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली. डीजीसीएने सांगितले की, हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे विमान टेक ऑफ केल्यानंतर परतले. विस्तारा फ्लाइट UK-781 चे हायड्रोलिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानाच्या पायलटला विमानाच्या हायड्रोलिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्याची माहिती उड्डाण घेताच आली. पायलटने याची माहिती एटीसीला दिली. यानंतर दिल्ली विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली. संपूर्ण आणीबाणी घोषित केल्यानंतर दिल्लीहून भुवनेश्वरला जाणारे विमान सुरक्षितपणे दिल्लीत उतरल्याची आणि सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती डीजीसीएने दिली.