VIDEO: शिंकताना गेला जीव

Webdunia
सोमवार, 5 डिसेंबर 2022 (10:56 IST)
Twitter
क्षणभरही जीवाचा भरवसा नसतो... अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर, सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुण चालत असताना पडला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाला शिंक लागताच तो जमिनीवर पडला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांसह रस्त्यावर निघालेला एक तरुण अचानक डोके धरून खाली पडतो. तरुणाला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
 

संबंधित माहिती

पुढील लेख