या गावात लस घेतली तरच दारु, वॅक्सीनेशनसाठी भन्नाट कल्पना

मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (11:55 IST)
तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे की ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनाच सरकारी दारूच्या दुकानातून दारू दिली जाईल. जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे की ग्राहकांना कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र विक्रेत्याला दाखवल्यावरच दारू दिली जाईल. जिल्हाधिकारी यांनी यामागील कारण दिले आहे की अशा प्रकारे कोरोना लसीकरण मोहिमेला चालना मिळेल.
 
कोरोना काळात अनेक ठिकाणी लसीकरण प्रमाणपत्र सक्ती करण्यात येत आहे. तर लसीकरण केलं असेल तर बऱ्याच ठिकाणी मुभा दिली जात आहे. अशातच आता तामिळनाडूतील नीलगिरी जिल्ह्यात दारु घ्यायची असेल तर लसीकरण प्रमाणपत्र सक्तीचं केलं आहे.
 
तामिळनाडूत सरकारी दारू विक्री केंद्रातून दारू विकत घ्यायची असल्यास आधार कार्ड आणि लसीकरणाचं प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक आहे. तामिळनाडू राज्यात अशी योजना राबवणारा नीलगिरी हा पहिलाच जिल्हा ठरला आहे. 1 सप्टेंबर 2021 पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
 
तमिळनाडूतील पर्यटकांमध्ये निलगिरी खूप प्रसिद्ध आहे. लोक मोठ्या संख्येने निलगिरीला पोहोचतात. राज्याने पर्यटन स्थळांवर विशेष लक्ष दिले आहे, यामुळे मोठ्या संख्येने लोक येणे अपेक्षित आहे. प्रदीर्घ लॉकडाऊननंतर सर्व क्षेत्र पुन्हा एकदा उघडले जात आहेत.
 
अधिकाऱ्यांचा असा दावा आहे की लोकांना अजूनही लसीबद्दल भीती आहे. असे लोक दारू पितात पण लसीच्या नकारात्मक परिणामांना घाबरतात. प्रशासनाने हा निर्णय फक्त प्रत्येकाच्या लसीकरणासाठी घेतला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती