पंतप्रधान मोदी आज करतील आयुष्यमान भारत डिजिटल मिशन लॉन्च,लोकांना हेल्थ आयडी मिळेल

सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (10:53 IST)
पंत प्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ करतील.हा प्रकल्प प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य मिशन किंवा राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन म्हणूनही ओळखला जातो. गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी याची घोषणा केली होती. सरकारने आज सुरु केलेल्या या मोहिमेला ऐतिहासिक म्हणून संबोधले आहे आणि या अंतर्गत प्रत्येक नागरिकाकडे आरोग्य ओळखपत्र असेल.आयुष्मान भारत डिजिटल मिशन सध्या सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रायोगिक टप्प्यात राबवले जाणार आहे.
 

Tomorrow, 27th September is an important day for India’s healthcare sector. At 11 AM, the Ayushman Bharat Digital Mission would be launched. This Mission leverages technology to improve access to healthcare and opens doors for new innovation in the sector. https://t.co/MkumY17Ko1

— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2021
लॉन्च करण्याच्या एक दिवस आधी, पीएम मोदींनी ट्विट केले, "भारताच्या आरोग्य क्षेत्रासाठी 27 सप्टेंबर हा एक महत्त्वाचा दिवस आहे. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन सकाळी 11 वाजता सुरू होईल. हे मिशन सेवेतील प्रवेश सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेते आणि त्या क्षेत्रात नवकल्पनासाठी. "नवीन दारं देखील उघडते.


असेही म्हटले जात आहे की हे मिशन इको-सिस्टीमसाठी देखील महत्त्वपूर्ण सिद्ध होईल आणि यूपीआयने पेमेंटच्या क्षेत्रात जी भूमिका बजावली आहे तीच भूमिका बजावेल. या मिशन प्रक्षेपणावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया देखील उपस्थित राहतील. त्यांनी ट्विट केले,“हे मिशन डिजिटल आरोग्य परिस्थितीकी मध्ये माहितीची देवाणघेवाण सक्षम करण्यासाठी सहज असे ऑनलाइन व्यासपीठ तयार करेल. नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होतील. "
 
जन धन,आधार आणि सरकारच्या इतर डिजिटल उपक्रमांप्रमाणे, आयुष्मान भारत डिजिटल मिशन डेटा, माहितीच्या विस्तृत श्रेणीद्वारे एक ऑनलाइन व्यासपीठ तयार करेल. या मिशनद्वारे लोक आरोग्य नोंदींची देवाण घेवाण करू शकतील. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती