27 जून रोजी होणारी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षा आता 10 ऑक्टोबरला तहकूब करण्यात आली आहे

गुरूवार, 13 मे 2021 (15:31 IST)
UPSC Prelims 2021: कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता UPSCने 27 जून रोजी होणारी सिविल सर्विसेज प्री-एग्जाम  पुढे ढकलली आहे. आता ही परीक्षा 10 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 27 जून 2021 रोजी होणार होती.  
 
यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत यावर्षी 712 आणि भारतीय वन सेवा परीक्षेत 110 जागा रिक्त आहेत. ही परीक्षा देशातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे की मागील वर्षी देखील कोरोनामुळे या परीक्षेवर परिणाम झाला होता. गेल्या वर्षीही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. 2020 मध्ये, यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षा 31 मे ते 4 ऑक्टोबर 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आली.
 
ही परीक्षा तीन टप्प्यात होते. प्री, मेन्स आणि मुलाखती नंतर विद्यार्थ्यांची निवड भारतीय नागरी सेवेसाठी केली जाते. दरवर्षी सुमारे 2 ते अडीच लाख विद्यार्थी पूर्व परीक्षेमध्ये भाग घेतात.  
 
मेन्स परीक्षेत भाग घेणार्या जवळपास एक तृतियांश विद्यार्थ्यांना मुलाखतीत येण्याची संधी मिळते. नागरी सेवांसाठी अंतिम गुणवत्ता मुख्य आणि मुलाखतींची संख्या एकत्र करून केली जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती