Tripura : 12वी उत्तीर्ण मुलींना मिळणार मोफत स्कूटी, राज्य सरकारची घोषणा

शनिवार, 8 जुलै 2023 (18:02 IST)
केंद्र शासन कडून वार्षिक अर्थसंकल्प सादर केल्यानंतर कर्नाटकानंतर आता त्रिपुराचे अर्थमंत्री प्रणजित सिंह रॉय यांनी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 27,654 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारच्या कराची तरतूद नाही. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थसंकल्प सादर करताना रॉय म्हणाले की, राज्याची अर्थव्यवस्था आठ टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे.
 
आमचे पालक आम्हाला परीक्षेच्या वेळी नेहमी आमिष द्यायचे की आम्ही पास होऊन आमच्या वर्गात टॉप झालो तर तुम्हाला गाडी किंवा सायकल मिळेल. आता सरकारने तसे काम सुरू केले आहे. कर्नाटकानंतर, तिच्‍या त्रिपुरा सरकारने 12 वीत सर्वाधिक गुण मिळविणार्‍या टॉप 100 मुलींना सरकार स्‍कुटर देण्‍याची घोषणा केली आहे.या घोषणेमुळं त्रिपुरा सरकार चर्चेत आलं
 
12 मध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या 100 मुलींना उच्चशिक्षणासाठी प्रेरणा देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं मोफत स्कूटर दिली जाणार आहे. या योजनेसाठी 'मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजनेचा प्रस्ताव पुढे केला आहे. राज्यशासनाकडून मुलींना उच्चशिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने टाकलेले हे पाउल आहे. 
 
 
अर्थमंत्री प्रणजित सिंग रॉय यांनी सांगितले की, भांडवली गुंतवणूक 5,358.70 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. हे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 22.28 टक्के अधिक आहे. अर्कल्पात 611.30 कोटी रुपयांची तूट येण्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेच्या धर्तीवर आरोग्य विमा योजना 'मुख्यमंत्री जन आरोग्य योजना-2023' (CM-JAY) सुरू करण्याचा प्रस्ताव मंत्र्यांनी ठेवला.
 
दरवर्षी 5 लाखांचे विमा संरक्षण योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा लाभ दरवर्षी दिला जाईल. राज्य सरकारी कर्मचारीही याच्या कक्षेत येतील. या योजनेसाठी सरकार दरवर्षी सुमारे 589 कोटी रुपये खर्च करणार आहे. याशिवाय 12वीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या 100 मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यासाठी 'मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना' ही नवीन योजना सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे.


Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती