या योजनेनुसार, कोणताही स्मार्टफोन घेतल्यावर ग्राहकाला दोन किलो टोमॅटो मोफत दिले जाणार आहे. या दुकानदाराची ही योजना लोकांना भुरळ घालत आहे. मोफत टोमॅटोची ऑफर पाहून अनेकजण या मोबाईल शॉपीपर्यंत पोहोचत आहेत. या योजनेचा टोमॅटोप्रेमींना कितपत फायदा होईल, हे माहीत नाही, मात्र सध्या तो परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
दुकानदार म्हणाले, आम्ही ही योजना टोमॅटोच्या वाढत्या दरामुळे सुरु केली आहे.
प्रत्येक कंपनीच्या मोबाईलवर मोफत टोमॅटो ऑफर दिली जात आहे. यामुळे विक्री थोडी मोठी झाली असली तरी ग्राहक मात्र खूश दिसत आहेत. त्याचवेळी सोशल मीडियावर लोक टोमॅटोच्या वेगवेगळ्या प्रकारची रील दाखवत आहेत.