मध्यप्रदेशातील इंदूर शहरातून दारू पिऊन रस्त्यात तरुणींनी धिंगाणा घालत हाणामारीचा व्हिडीओ समोर आला आहे .इंदूरमधील एलआयजी तिराहे येथे मध्यरात्री मुलींनी गोंधळ घातला. चार मुलींनी एका मुलीला बेदम मारहाण केली. रस्त्यातच शिवीगाळ करून तिचा मोबाईलही फोडला . या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी कोणतीही तक्रार आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दोन महिन्यांपूर्वी इंदूरच्या बीआरटीएस कॉरिडॉरच्या बाजारपेठा 24 तास सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती. त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त कमी असते. दोन दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एलआयजी तिराहे येथे चार मुली एका मुलीला मारहाण करताना दिसत आहेत. तेथे उपस्थित प्रेक्षकांनी मुलींमधील हाणामारी चा व्हिडिओ बनवला.
एलआयजी मधील रहिवासी सांगतात की, बीआरटीएस मार्केट चोवीस तास सुरू असल्याने अशा घटना वारंवार समोर येत आहेत. येथे पोलिस बंदोबस्त नाही. हा चौक बीआरटीएसच्या व्यस्त चौकांपैकी एक आहे. जेव्हा अशी घटना इथे घडू शकते, तेव्हा कुठेतरी एखादी गंभीर घटना घडू शकते. मद्यधुंद तरुण -तरुणी 24 तास सुरू असलेल्या रेस्टॉरंटमध्ये येतात आणि आपापसात वाद घालतात. या चौकाचौकात दिवसा पोलीस वाहनांचे चालान कापताना दिसतात, मात्र रात्री दारूच्या नशेत राहणाऱ्या मुला-मुलींवर कारवाई होत नाही.