झारखंडमधील रामगडमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. तेथे 21 दिवसांच्या नवजात मुलीच्या पोटातून 8 भ्रूण काढण्यात आले आहेत. मुलीवर शस्त्रक्रिया करत असताना डॉक्टरांना ही आश्चर्याचा धक्का बसला. हे कसे झाले हे डॉक्टरांना समजले नाही.जगात पहिल्यांदाच असे घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नवजात मुलीच्या पोटातून 8 भ्रूण काढल्यानंतर ती पूर्णपणे बरी आहे. मुलीचा जन्म 10 ऑक्टोबर रोजी झाला. मुलीच्या जन्मानंतर रामगढ येथील राणी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सीटी स्कॅन केले, डॉक्टरांना वाटले की मुलीच्या पोटात ट्यूमर आहे. मात्र ऑपरेशननंतर बाळाच्या पोटात 8 भ्रूण पाहून डॉक्टरही हैराण झाले.
रामगढ येथील राणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेश कुमार यांनी सांगितले की, जगातील ही पहिलीच केस आहे. 21 दिवसांच्या चिमुरडीवर शस्त्रक्रिया करून आम्ही 8 भ्रूण काढले आहेत. या रुग्णालयाचे बालरोग शल्यचिकित्सक डॉ. इमरानने सांगितले की, ट्यूमरची तक्रार घेऊन कुटुंबीय मुलीला आमच्याकडे घेऊन आले होते. जेव्हा बाळाचे स्कॅन केले तेव्हा आम्हाला आढळले की तिला गाठ नाही, तिच्या पोटात 8 गर्भ आहेत.